मानोरा(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस ) – राज्य शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या विविध समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र.१” अंतर्गत मानोरा तालुक्यात मार्च ते मे २०२६ या कालावधीत विविध मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासन निर्णय क्र. मरठा-२०२६/प्र.क्र.०९/समन्वय-१, मंत्रालय मुंबई दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ नुसार हे शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा, अर्ज, तक्रारी व प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्यात येणार आहे.
मानोरा तालुक्यात पुढीलप्रमाणे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत –
७ मार्च २०२६ रोजी उमरी बु. (ग्रामपंचायत कार्यालय), १४ मार्च २०२६ रोजी शेंदुर्णा (कर्मयोगी नामदेवराव काळे स्मृती सभागृह), १० एप्रिल २०२६ रोजी कुपटा (महादेव मंदिर सभागृह), १७ एप्रिल २०२६ रोजी इंदोरी (श्री गजानन महाराज मंदिर सभागृह), ८ मे २०२६ रोजी मानोरा (तहसील कार्यालय सभागृह) आणि १५ मे २०२६ रोजी गिरोली येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, या शिबिराबाबत माहिती देण्यासाठी ५ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता तहसील कार्यालय मानोरा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी शासनाच्या या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, विद्यार्थी व महिलांनी घ्यावा, असे आवाहन केले
No comments:
Post a Comment