उमरी खुर्द (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस ) – उमरी बु. येथे दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद शाळा उमरी बु. येथील तलाठी कार्यालयात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.
उमरी बु. मंडळांतर्गत पोहरादेवी, उमरी खुर्द, उमरी बु., पिपलशेंडा, वसंतनगर आदी गावांचा समावेश असून या सर्व गावांतील शेतकरी व नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ अधिकारी संदीप आडे यांनी केले आहे. यावेळी ग्राम महसूल अधिकारी आश्विन रामटेके व महसूल सेवक संतोष जाधव यांनीही शेतकऱ्यांना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या शिबिरामध्ये ७/१२ उतारा अद्यावत करणे, उत्पन्न दाखले, भोग-२ मधील भोग-१ करण्याची प्रकरणे, नवीन अकृषित प्रकरणे (कलम ४२) याबाबत माहिती व निपटारा, भू-संपादन झालेल्या प्रकरणांतील गाव दप्तर अद्यावत करणे तसेच शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील सर्व शेतकरी व नागरिकांनी या समाधान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment