Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, March 6, 2026

चिखली येथील कामातील ‘सर्वेक्षण व डिझाईन’ शुल्कावर प्रश्नचिन्ह लघु पाटबंधारे विभागाकडे कागदपत्रांची मागणी

मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
तालुक्यातील मौजे चिखली येथे करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये “Consultation Charges for Survey and Design” या शीर्षकाखाली कंत्राटदारास रुपये ५ लाख अदा करण्यात आल्याची बाब समोर आली असून या खर्चाबाबत संबंधित सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेसचे संपादक जगदीश राठोड यांनी लघु पाटबंधारे विभाग, कारंजा येथील कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कामांमध्ये कंत्राटदाराच्या कामात सर्वेक्षण व संकल्पना (Design) यांचा समावेश नसताना देखील “Consultation Charges for Survey and Design” या बाबीवर पाच लाख रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सर्वेक्षण व संकल्पना न करता अंदाजपत्रक तयार करण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच अवास्तव व चुकीचे अंदाजपत्रक मंजूर करून त्यानुसार कामे करण्यात आल्याने शासनाच्या निधीचा अवास्तव खर्च झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी कंत्राटदारास अदा करण्यात आलेल्या सर्वेक्षण व संकल्पना (Design) संदर्भातील सर्व दस्तऐवज, सर्वेक्षण अहवाल, मान्यताप्राप्त आराखडे (Design Documents) तसेच संबंधित क्षेत्राचा Topo Sheet उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर माहिती यापूर्वी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागविण्यात आली असतानाही आवश्यक कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर