मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) – मानोरा तालुक्यातील दिग्रस रोडवरील विठोली येथे नव्याने ‘नायरा’ पेट्रोल पंप सुरू झाला असून या पंपावर वाहनधारकांसाठी विविध आधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नव्याने सुरू झालेल्या या नायरा पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलसोबतच मोफत हवा, स्वच्छ प्रसाधनगृहे तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना येथे थांबताना अधिक सोयीस्कर वातावरण मिळत आहे.
मानोरा-दिग्रस मार्ग हा नेहमीच वर्दळीचा असल्याने या मार्गावर दर्जेदार सेवा देणारा पेट्रोल पंप सुरू झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. या पंपावर स्वच्छता, ग्राहक सेवा आणि सुविधा यांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
दरम्यान, तालुक्यातील इतर पेट्रोल पंप चालकांनीही ग्राहकांच्या सोयीसाठी अशाच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिक व वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment