Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, March 28, 2026

धानोरा (घा) येथे श्री महादेव संस्थानात भागवत कथेचा शुभारंभ; भक्ती, ज्ञान व वैराग्यावर प्रभावी मार्गदर्शन

मानोरा प्रतिनिधी :
मानोरा तालुक्यातील धानोरा (घा) येथील श्री महादेव संस्थानमध्ये आयोजित भागवत कथेच्या पहिल्या दिवसाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या धार्मिक सोहळ्यात प्रमुख भागवत वाचक अनाम कबीर पंथी, वाणीभूषण ह.भ.प. श्रीराम महाराज चिखलीकर यांनी आपल्या ओजस्वी वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कथेच्या प्रारंभी महाराजांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करत सखोल विवेचन केले. अज्ञानामुळे दिशाहीन झालेल्या जीवांना भागवत कथेच्या माध्यमातून योग्य मार्गावर कसे आणता येते, याचे प्रभावी उदाहरणांसह मार्गदर्शन त्यांनी केले. त्यांच्या प्रवचनातून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक उर्जा व मानसिक समाधान लाभले.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रात्री ८ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात येत असून, त्यामुळे भाविकांना शांत व प्रसन्न वातावरणात कथा श्रवणाचा लाभ मिळत आहे.
या प्रसंगी गावातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी भक्तिभावाने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला. अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता, नैतिक मूल्ये आणि एकात्मता वृद्धिंगत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर