Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, March 27, 2026

पोहरादेवी रामनवमी यात्रा उत्सव यशस्वी; प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक. धर्मगुरू कबीरदास महाराजाने मानले आभार


मानोरा : काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे चैत्र शुद्ध रामनवमी व श्री सेवालाल महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. देशभरातून लाखो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
यात्रेदरम्यान वाशिम जिल्हा प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे संपूर्ण उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पडला. भाविकांच्या सोयीसाठी केलेली व्यवस्था, चोख बंदोबस्त आणि सुरळीत दर्शन व्यवस्था यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन व समन्वय साधून यात्रेचे यश सुनिश्चित केले. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
धर्मगुरू कबीरदास महाराज व श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट, पोहरादेवी यांच्या वतीने प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच व्यापारी, गावकरी, स्वयंसेवक व भाविकांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
“जय सेवालाल”च्या जयघोषात उत्सवाचा समारोप करण्यात आला.

No comments:

Post a Comment

फॉलोअर