Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, March 31, 2026

गौतम नगर व महात्मा फुले नगरच्या समस्यांवर ‘ब्लू पँथर’ आक्रमक; नगराध्यक्षांना निवेदन

कारंजा (महादेव तायडे ) — शहरातील गौतम नगर आणि महात्मा फुले नगर परिसरातील प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘ब्लू पँथर’ संघटनेने आक्रमक पवित्रा घेत नगराध्यक्षांच्या नावे मा. हाजी मोहम्मद युसुफ सेठ पुंजानी यांना निवेदन सादर केले. यावेळी रस्ते, पथदिवे व नाल्यांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात कार्यकर्त्यांनी परिसरातील विविध समस्यांचा पाढा वाचत गंभीर परिस्थिती मांडली. गौतम नगर ते नागवाणी शाळा मार्गे सिंधी कॅम्पकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून, त्याचे तात्काळ री-कॉंक्रीटिंग करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच, या मार्गावर पथदिव्यांचा अभाव असल्याने रात्री अपघातांची शक्यता वाढत असून नवीन दिवे बसवण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

पंचायत समितीपासून महात्मा फुले नगरकडे जाणारा नाला तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाल्याचे पुनर्बांधकाम करण्याची मागणीही करण्यात आली. याशिवाय, गौतम नगरमधील मोकळ्या जागेत युवकांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्याचा प्रस्ताव नगर परिषदेकडून मंजूर करावा, अशी मागणी संघटनेने केली.

“नागरिक नियमित कर भरत असतानाही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा ‘ब्लू पँथर’ संघटनेने दिला.

दरम्यान, निवेदन स्वीकारल्यानंतर मा. हाजी मोहम्मद युसुफ सेठ पुंजानी यांनी सकारात्मक भूमिका घेत “सर्व मागण्या रास्त असून, नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक बाबींची तपासणी करून लवकरात लवकर कामे मार्गी लावली जातील,” असे आश्वासन दिले.

यावेळी ‘ब्लू पँथर’चे अध्यक्ष अ‍ॅड. निलेश खंडारे, उपाध्यक्ष अ‍ॅड. पंकज सावळे, सचिव सुरज गणराज, मीडिया प्रभारी महादेव तायडे, संघटक रंगराव गोपनारायण यांच्यासह रॉबिन आठवले, बाळासाहेब ठोबरे, अंकुश ठोबरे, प्रदीप हरियर, भुपेंद्र हरियर, मिथुन खरात, गोपाल ढवळे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर