Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, March 30, 2026

वाशिम शहरात पाणी संकट; नळातून पिवळसर पाणी, नागरिकांची चिंता वाढली*

वाशिम : ( अफसर शहा)
वाशिम शहरातील पाणीपुरवठा सध्या गंभीर संकटात आहे. जुनी आययुडीपी कॉलनीसह शहरातील अनेक भागांमध्ये नळातून पिवळसर आणि गाळयुक्त पाणी येत असल्याचे नागरिकांनी नोंदवले. गेल्या काही दिवसांपासून ही समस्या अधिक तीव्र झाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नळाद्वारे येणारे दूषित पाणी वापरणे धोकादायक ठरत असून अनेकांनी पर्यायी उपाय शोधले आहेत. मात्र दररोज शुद्ध पाणी खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्यामुळे नागरिकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा पाण्यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग, अतिसार, उलट्या यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती यांचा धोका जास्त आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढत असल्यामुळे ही समस्या अधिक चिंताजनक ठरली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की नगर परिषद प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. ‘पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे, हीच आमची अपेक्षा आहे,’ असे अनेकांनी व्यक्त केले.

*बॉक्स*
*पाणीपुरवठा लाईनमधील गळती आणि जुन्या पाइपलाइनची दुरवस्था*
जलशुद्धीकरण प्रक्रियेत त्रुटी तातडीने उपाय म्हणून: दूषित पाणीपुरवठा थांबवून स्वच्छ पाणी उपलब्ध करणे
जलशुद्धीकरण प्रकल्पांची नियमित तपासणी व देखभाल, पाईपलाईनमधील गळती व तांत्रिक बिघाड दुरुस्त करणे
पाण्याच्या गुणवत्तेची नियमित चाचणी आणि अहवाल सार्वजनिक करणे, शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि मूलभूत सुविधा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर