Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, May 1, 2026

वाशिम येथे आदिवासी बांधवांना संविधान पुस्तकांचे वाटप.


शेंदुरजना (अ)/ वाशिम (दिग्रस साप्ताहिक एक्सप्रेस)        वाशिम जिल्ह्यातील आदिवासी  समाज बांधवांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क व अधिकारांची जाणीव व्हावी तसेच  कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे या उद्दात्त हेतुने जेष्ठ समाजसेवक भारत टारपे यांच्या कल्पनेतून, पुस्तक यात्रा ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने, भारतीय संविधानाच्या २०० प्रतीचे वाटप दिनांक २ मे २०२६ रोज शनिवारला वेळ १२ः०० वाजता श्री परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान महेश नगर वाशिम येथे पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. 
या कार्यक्रमा करीता प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून तुकाराम भिसे मुख्य लेखा अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, भारत टारपे  सहायक आयुक्त जी.एस.टी. चंद्रपूर, पुष्पराज वाघमारे ग्रंथालय अधिकारी नागपूर,  सदाशिव आसोले  मुख्य प्रबंधक एल.आय.सी नांदेड,  डी.जे वाळके, जानकीरामजी डाखोरे  से.नि.पोलीस अधीक्षक हे उपस्थित राहून सविधान या विषयावर सविस्तर  मार्गदर्शन करणार आहे.
 करीता या कार्यक्रमासाठी वाशिम जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांनी व महिला भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी कर्मचारी संघटना वाशिम तथा महादेव वाघमारे, जिवण हगवणे, चिंतामण कळंबे, चंदुभाऊ भुजाडे, आनंद खुळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर