Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, May 5, 2026

पत्रकारांनी लिखाणासोबतच सामाजिक कार्यातही पुढे आलं पाहिजे....आमदार गोपीकिशन बाजोरिया

अकोला (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
ज्येष्ठ पत्रकार संजय देशमुख यांच्या ६० व्या  जन्मदिन अभिष्टचिंतन कार्यक्रमात अभिनव कर्तृत्व आणि  नेर्तृत्वाचा गौरव,दिव्य विदर्भ विशेषांकाचे प्रकाशन

    रोकडे सभागृहातील श्रमिक महिलेचाही तिच्या जन्मदिनी केला सन्मान..शाल व पुष्पगुच्छ देत अभिष्टचिंतन...संजय देशमुख यांनीच  निमंत्रित करून जन्मदिन अभिष्टचिंतनाचा साधला हा अनोखा संगम!

गोपीकिशन बाजोरिया, गिरधारीलाल सारडा,ममता इंगोले, डॉ.गजानन नारे,प्रा प्रकाश डवले,नगरसेवक आशिष पवित्रकार,इंजि‌.नगरसेवक प्रशांत जोशी,कल्पनाताई बंडूबाप्पू देशमुख, स्वप्ना ला़ंडे,व अनेक मान्यवरांची उपस्थिती.

    सामाजिक प्रश्नांचा अभ्यास लोकशाही मुल्ल्यांची जाणीव असणाऱ्या असणाऱ्या संवेदनशील पत्रकारांनी व्यापक समाजहितासाठी राजकारणातही सहभागी झालं पाहिजे.कर्तृत्वाने अग्रेसर असणाऱ्या प्रभावी नेर्तृत्वांची राजकारणात खरी गरज असून संजयभाऊ  देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सामाजिक विकासाला निश्चितच गती मिळेल.पत्रकार आणि समाजकल्याणाला योग्य दिशा मिळून महाराष्ट्रात शिवसेनेचे संघटन प्रबळ होण्यासाठी निश्चित मोठी मदत होईल असा आशावाद विधान परिषद सदस्य अकोला येथील कर्तव्यदक्ष आमदार गोपिकिशन बाजोरिया यांनी व्यक्त केला‌.संजय देशमुख यांना शुभेच्छा व्यक्त करीत शिवसेना प्रवेशाबध्दलही  अभिनंदन !

      लोकस्वातंत्र्य अकोला जिल्हा सचिव मनोहर मोहोड यांनी त्यांच्या व्यवसायातून वेळ काढून त्यांच्या दिव्य मराठीचा जन्मदिन विशेषांकाचे प्रकाशन घडवून आणले.त्याबध्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांचेसह प्रिन्टर संतोष धरमकर यांचा सत्कार !

     यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे बाबा व महापुरूषांना वंदन, अभिवादन करण्यात आले.विविध बळींना श्रध्दांजली !
 
    लोकस्वातंत्र्यच्या चळवळीचे कौतुक करीत चांगल्या विचारवंत लोकांनी राजकारणात येण्याची आवश्यकता...
@ प्रा.प्रकाश डवले

     माझ्या भावाच्या लिखाणातील हृदयाला भिडणाऱ्या शब्दांनी बहिणींची महिलाशक्ती लोकस्वातंत्र्यच्या सामाजिक प्रवाहात सहभागी झाली असून उदात्त जीवनमुल्ये घेऊन जगणारे पत्रकार आणि साहित्यिक एकाच नाण्याच्या दोन बाजू ! 
@ प्रा.डॉ.ममताताई इंगोले

 अध्यक्षांमध्ये अथक उर्जाशक्ती,कर्तृत्व, समता आणि मानवतावादी मुल्ये....!
@ पुष्पराज गावंडे,राजेन्द्र देशमुख,,पत्रकार निशाली पंचगाम,स्वप्ना लांडे,किर्ती मिश्रा,दिलीप बढे व ईतर मान्यवर

No comments:

Post a Comment

फॉलोअर