Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, May 16, 2026

सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका रुपाताई मानकर यांचे निधन


दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
पंचायत समिती दिग्रसचे माजी सभापती मिलिंद मानकर तसेच रामदास आठवले कापूस सूतगिरणीचे अध्यक्ष महेंद्र (सोना) मानकर यांच्या मातोश्री, राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका रुपाताई नागसेन मानकर (पुष्पा भवरे) यांचे वयाच्या 83 व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता दुःखद निधन झाले.

त्या हरसूल येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक वर्षे शिक्षिका व त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. आपल्या शैक्षणिक कार्यातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविले. साक्षरता अभियान, महिला बचत गट अशा सामाजिक आणि महिला सक्षमीकरण विषयक कार्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्या दिग्रस तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होत्या. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक विवाहित मुलगी, नातवंडे तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता हरसूल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

फॉलोअर