मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
तालुक्यातील ग्रामपंचायत वाईगौळने राज्यस्तरावर मानाचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “महा आवास अभियान 2023-24” अंतर्गत ग्रामपंचायत वाईगौळ यांना “स्वयंपूर्ण ग्रामपंचायत” म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी व प्रभावी अंमलबजावणीबद्दल ग्रामपंचायत वाईगौळचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना सरपंच उमेश राठोड, उपसरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
या यशाबद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, मानोरा तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
No comments:
Post a Comment