मानोरा :--वनपरिक्षेत्र अधिकारी, मानोरा यांच्या कार्यक्षेत्रातील गिरोली वनवर्तुळ, सावरगाव कान्होबा वनबिटातील कक्ष क्र. १३८ मध्ये तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कोट्यवधींच्या अपहाराचे प्रकरण दाबण्यासाठी संबंधितांकडून या संपूर्ण भागाला आग लावून पुरावा नष्ट करण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर संशय तालुक्यातील कारखेडा येथील जागरूक नागरिक प्रदीप मोहनराव सोळंके यांनी खबरदारीची तातडीची लेखी सूचना करून व्यक्त केला आहे. त्यांनी वन प्रशासनाकडे तातडीने खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.
दि. ११/०४/०२४ रोजी सकाळी कॅमेऱ्याने टिपलेल्या फोटोत "महाराष्ट्र शासन, वाशिम वनविभाग" चा फलक स्पष्ट दिसतो. फलकावर भरिव वनीकरण योजनेअंतर्गत मिश्र रोपवन, सावरगाव कां. मिश्र रोपवन सन २०२२-०२३, कक्ष क्र. १३८, क्षेत्र २० हेक्टर, तांत्रिक मंजुरी क्र. ३८ दि.२३/०९/०२२
मात्र फलकाच्या समोर जमिनीवर फक्त एक वाळलेलं रोप दिसतंय. उर्वरित २० हेक्टर जागा पूर्णपणे माळरान व गवताळ आहे. २० हेक्टर = २ लाख चौरस फूट जागेत रोपे सद्यस्थितीत गहाळ झाले आहे हा उघड उघड "कागदी रोपवन" घोटाळा आहे.
'आता तक्रार देऊन प्रकरण उघड झाल्यावर, संबंधित अधिकारी पुरावा नष्ट करण्यासाठी या कोरड्या गवताला आग लावतील. मग तपासणीला आल्यावर म्हणतील 'आगीत सगळी झाडं जळाली'. हा कट उधळून लावण्यासाठी वन प्रशासनाने तातडीने या भागात फायर वॉचमन तैनात करावे, सिसीटिव्ही लावावे" अशी मागणी सोळंके यांनी केली आहे.
तक्रारकर्त्याच्या वतीने उपरोक्त निवेदन उपवनसंरक्षक वाशिम तथा वनपरिक्षेत्र अधिकारी मानोरा यांना समाज माध्यमावर पाठविले आहे ज्याची दोन्ही अधिकाऱ्यांनी सकारात्मक दखल घेतली आहे.
चौकट:---
सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पर्यावरणवादी ज्यांनी हा घोटाळा जगासमोर आणला आहे, त्यांनी गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात आणि यावर्षी एप्रिल व मे मध्ये जीपीएस प्रणाली द्वारा फोटो व व्हिडिओ चित्रण केलेले असल्यामुळे वादग्रस्त वन जमिनीला आग लागल्यास ही ठरवून पुरावा नष्ट करण्याची कृती असेल जी वन प्रशासनाला आणखी संशयाच्या घेऱ्यात घेऊन जाईल अशी पुस्ती सुद्धा प्रदीप सोळंके यांनी निवेदनामध्ये जोडली आहे.
फोटो:---
No comments:
Post a Comment