मानोरा, : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
गोर बंजारा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक विकासासाठी कार्यरत असलेल्या गोर सेना गोर सीकवाडी संघटनेच्या मानोरा तालुका सहसंयोजकपदी डॉ. सुधाकर राठोड (साई सेवा क्लिनिक, मानोरा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा येथे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. गोर बंजारा समाजाचे संस्थापक जनक काशिनाथ नायक यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली गोर सीकवाडी चळवळ समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक प्रश्नांवर प्रभावीपणे कार्य करत आहे.
या नियुक्तीप्रसंगी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, प्रकाश पवार (नांदेड), प्रा. अनिल राठोड (वाशिम), प्रकाश राठोड, अशोक राठोड (बीड), मोतीराज जाधव यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुधाकर राठोड यांच्या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मानोरा तालुक्यात गोर सेना गोर सीकवाडीचे कार्य अधिक गतिमान व व्यापक होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच समाजातील युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment