वाशीम : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
महावितरणच्या वाशिम जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता म्हणून श्री.संदीप दरवडे रुजू झाले आहे.
श्री. दरवडे हे २००४ मध्ये तत्कालिन विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून अवसरी (जि.पुणे) येथे रुजू झाले. महावितरणमधील २२ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी कनिष्ठ अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता अशा विविध पदांवर पुणे, नाशिक व जळगाव जिल्ह्यात उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यानंतर अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती होऊन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. महावितरण वाशिम जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता अजय शिंदे यांची रत्नागीरी येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
त्यामुळे या रिक्त झालेल्या पदावर श्री.संदीप दरवडे यांची बदली झाल्यानंतर त्यांनी येथील अधीक्षक अभियंता पदाचा पदभार स्विकारला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व ग्राहकाभिमुख सेवा देण्यास प्राधान्य राहील, असे श्री.दरवडे म्हणाले.
No comments:
Post a Comment