दिग्रस: (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
प्रभाग क्रमांक ८ मधील साईनाथ नगर परिसरात पालकमंत्री संजय राठोड यांच्या निधीतून मंजूर झालेल्या नाली बांधकामाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी परिसरातील साचणाऱ्या पाण्याची समस्या दूर व्हावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा, अशी येथील रहिवाशांची अनेक दिवसांपासून मागणी होती.
स्थानिक नागरिकांच्या या मागणीची दखल घेत नगरसेवक किशोर कोहचडे, शिवसेना उपशहर प्रमुख संदीप रत्नपारखी, बंडू चव्हाण व यश खामकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून नालीचे काम तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर नाली बांधकामाचे काम ठेकेदार अरविंद मिश्रा यांच्या माध्यमातून करण्यात येत असून, काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात होणारी पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
साईनाथ नगरातील नागरिकांनी आपली दीर्घकालीन मागणी पूर्ण झाल्याबद्दल पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, संबंधित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याचेही कौतुक केले आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी अशाच प्रकारे विकासकामे सुरू राहावीत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
No comments:
Post a Comment