Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, June 13, 2026

मानोरा तालुक्यात खुले तेल विक्रीला ऊत; नियमांची पायमल्ली, प्रशासनाचे दुर्लक्ष?


मानोरा,  : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) तसेच शासनाच्या नियमांनुसार सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असून ग्राहकांना केवळ सीलबंद पॅकबंद तेल विक्री करण्याचे निर्देश आहेत. मात्र मानोरा तालुक्यात अनेक किराणा दुकानांमध्ये आजही खुले तेल विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यातील अनेक दुकानांमध्ये जुनाट डबे, टाक्या मध्ये खाद्यतेलाचा साठा करून ग्राहकांना मोजून तेल विकले जात असल्याची माहिती समोर येत आहे. अन्न सुरक्षा नियमांनुसार जुन्या डब्यांचा पुनर्वापर केल्यास तेलाची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
तथापि, नियमांची सर्रास पायमल्ली होत असतानाही संबंधित यंत्रणा व प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. नागरिकांच्या मते, या प्रकाराकडे प्रशासनाने सोईस्कर दुर्लक्ष केल्यामुळे किराणा दुकानदारांकडून खुले तेल विक्रीचा व्यवसाय सुरूच आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असून अन्न सुरक्षा विभागाने तातडीने तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच मानोरा तालुक्यातील सर्व किराणा दुकानांची तपासणी करून खाद्यतेलाची गुणवत्ता व साठवणुकीची स्थिती तपासण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
"ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नको; खुले तेल विक्री थांबवा आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर