Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, June 27, 2026

योगिता भारद्वाज यांची शिरपूरच्या ठाणेदार पदावर वर्णी ! पोलिस उपनिरीक्षकांच्याही बदल्या

Ll


शेंदुरजना (अ) / वाशिम (दिग्रस साप्ताहिक एक्सप्रेस)

वाशिम जिल्हा पोलीस दलात २५ जून २०२६ रोजी मोठे फेरबदल करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी सार्वत्रिक व प्रशासकीय बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या अंतर्गत शिरपूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह जिल्ह्यातील अनेक पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रिक्त झालेल्या कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे आता संपूर्ण पोलीस विभागाचे लक्ष लागले आहे.
शिरपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार वाघ यांची पदोन्नती झाल्याने हे पद रिक्त झाले होते; त्या रिक्त जागी आता योगिता भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शुक्ला यांचीही पदोन्नती झाल्याने तेथील ठाणेदारपद सध्या रिक्त आहे. या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर "बॅक ऑफिसला"  कार्यरत असणाऱ्या चार पोलीस निरीक्षकांपैकी कोणाची वर्णी लागते, याकडे आता संपूर्ण पोलीस विभागाचे लक्ष लागून राहिले आहे.
यादरम्यान जिल्हा पोलीस दलातील अनेक पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. यामध्ये रिसोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रामदास गोखले यांची त्यांच्या विनंतीवरून स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) बदली करण्यात आली आहे. तर प्रशासकीय कारणास्तव झालेल्या बदल्यांमध्ये अशोक सिताराम गिते यांची रिसोडवरून अनसिंग येथे, संतोष भगवान शेटे यांची वाशिम ग्रामीणमधून रिसोड येथे, वसंत मारोती ठाकरे यांची कारंजा शहरमधून मंगरुळपीर येथे, तर स्वप्नील चंद्रसिंग चव्हाण यांची कारंजा ग्रामीणवरून धनज येथे पदस्थापना करण्यात आली आहे.याच आदेशानुसार, शिरपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक इम्रानखान युनुसखॉन पठाण आणि मानोरा येथील उपनिरीक्षक अभिजीत संजय बारे यांची कारंजा शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तसेच मंगरुळपीरचे दिनकर माधवराव राठोड यांची मानोरा येथे रवानगी करण्यात आली असून, मोटार परिवहन विभागाचे गणेश करोडदे यांची नियुक्ती पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. याशिवाय वाशिम शहरचे देविदास बापुराव झुंगे आणि अनसिंगच्या कविता अशोक नागरे यांना पोलीस दलात एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर