मानोरा (निळकंठ राठोड) : लोकमत समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या "महा सरपंच लोकमत अवॉर्ड 2026" पुरस्कार वितरण सोहळ्यात गट ग्रामपंचायत देऊरवाडीचे युवा, तडफदार व विकासाभिमुख सरपंच आशिष पाटील यांना प्रतिष्ठित महा सरपंच अवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले.
हा पुरस्कार रविवार, दि. 14 जून 2026 रोजी वाशिम येथे आयोजित कार्यक्रमात विधान परिषद आमदार भावना ताई गवळी, किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी योगेशजी कुंभेजकर तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
लोकमत समूहाने वाशिम जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या विकासकामांची सखोल तपासणी करून केवळ 14 सरपंचांची निवड केली होती. त्यामध्ये गट ग्रामपंचायत देऊरवाडीचे सरपंच आशिष पाटील यांची चौथ्या क्रमांकावर निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि लोकहिताच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी झाल्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.
यावेळी गट ग्रामपंचायत देऊरवाडी अंतर्गत चिखली, देऊरवाडी व गलमगाव येथील ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सरपंच आशिष पाटील म्हणाले, "लोकमत समूहाने माझ्या कामाची दखल घेत सलग तिसऱ्यांदा महा सरपंच अवॉर्ड देऊन गौरविल्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. मी केलेल्या विकासकामांची ही पावती असून यामुळे मला आत्मसमाधान मिळाले आहे. या सन्मानामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. इतर ग्रामपंचायतींनीही विकासकामांवर भर देऊन अशा पुरस्कारांचे मानकरी व्हावे," असे त्यांनी सांगितले.
या उल्लेखनीय यशाबद्दल आशिष पाटील यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देऊरवाडी गट ग्रामपंचायत ला लोकमत समूहाकडून तिसऱ्यांदा गौरवविण्यात आल्याने अभिनंदन .याहीपेक्षा अधिक ग्रामविकासाची कामे करून लोकमत नव्हे तर प्रशासनाकडून अवॉर्ड प्राप्त होवो अशी अपेक्षा चिखली वाशी करीत आहे.
No comments:
Post a Comment