शेंदुरजना (अ) / मानोरा (दिग्रस साप्ताहिक एक्सप्रेस)
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मौजे शेंदुरजना आढाव ग्रामपंचायत कार्यालय येथे शेतकरी बांधवांसाठी बीज प्रक्रिया उगम क्षमता व हुमणी अळी या बाबत नियंत्रण उपाययोजना तसेच कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांबाबत सहाय्यक कृषी अधिकारी एस. जि. पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मागील हंगामात परिसरातील काही भागात हुमणी अळी चा प्रादुर्भाव आढळून आल्याने चालू खरीप हंगामात पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व हुमणी अळी चे वेळीच नियोजन करता यावे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी एस. जि. पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हुमणी अळी नियंत्रण बाबत महत्व पटवून दिले तसेच कृषी विभागाच्या महाविस्तार AI एप व महा डीबीटी पोर्टल वरील विविध योजनांची प्रात्यक्षिक व बियाणे मिनी किट वाटप याविषयी सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे आव्हान कृषी विभागा मार्फत करण्यात आले. या कार्यक्रमाला सहाय्यक कृषी अधिकारी यांनी शेताच्या बांधावर लाईट तयार प्रकाश सापळा कसा उभारावा याचे सुद्धा प्रात्यक्षिक दाखविले सायंकाळी 7 ते 10 यावेळेतच प्रकाश सापळा का लावावा या मागील शात्रीय कारण स्पष्ट करत त्यांनी शेतकऱ्यांचे विविध शंकांचे निरसरण केले. या वेळेस हुमणी अळी चे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडून प्रकाशा कडे आकर्षित होत असल्याने त्यांचे नियंत्रण करणे अधिक प्रभावी ठरते. अश्या प्रकारची योग्य माहिती ही ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना सहाय्यक कृषी अधिकारी यांनी दिली. यावेळी शेंदुरजना गावातील शेतकरी ओंकार आढाव, लक्ष्मण पवार, वसंता जाधव, मांगीलाल राठोड, नंदन जाधव, ईश्वर पवार, कैलास खिराडे, मोतीराम बेलखडे, योगेश आढाव, प्रदीप काळे, रामदास जाधव, अमोल जाधव, धनुसिंग रबडे इत्यादी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment