Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Wednesday, July 22, 2026

मुंगळा (वाशिम) येथील अरजित मोरेच्या जिज्ञासेचा प्रवास निती आयोगापर्यंत!• जिज्ञासेपासून निती आयोगापर्यंत : अरजितच्या प्रेरणादायी प्रवासाची नवी नोंद१३ वर्षीय अरजित मोरेच्या पुस्तकाला निती आयोगाच्या ग्रंथालयात स्थान • स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्याच्या पुस्तकाचा निती आयोगाच्या ग्रंथालयात समावेश


वाशिम:( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस मानोरा) महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कूल, मुंबई येथील व वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून मुंगळा येथील १३ वर्षीय विद्यार्थी मास्टर अरजित अमोल मोरे याच्या "जिज्ञासा : फ्रॉम क्युरिऑसिटी टू क्लॅरिटी"  या पुस्तकाचा निती आयोगाच्या ग्रंथालयाच्या "New Collection - May 2026" मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे पुस्तक भारताच्या प्रमुख सार्वजनिक धोरण संस्थेच्या ज्ञानसंपदेत स्थान मिळवणारे ठरले असून ते संशोधक, धोरणनिर्माते, शासकीय अधिकारी आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध होणार आहे.

हे पुस्तक सीएसआयआर-जिज्ञासा "वन डे अ‍ॅज अ सायंटिस्ट" या कार्यक्रमांतर्गत सीएसआयआर-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (CSIR-NCL), पुणे येथे अरजितला आलेल्या प्रेरणादायी अनुभवावर आधारित आहे. विज्ञानातील प्रत्यक्ष अनुभवातून एका जिज्ञासू विद्यार्थ्याचा संशोधन, नवोपक्रम आणि विज्ञान प्रसाराकडे झालेला प्रवास या पुस्तकातून उलगडतो.
अवघ्या १३ व्या वर्षी अरजितने ९ संशोधन निबंध प्रकाशित केले असून तो पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या IISF-२०२५ अंतर्गत "One Innovation - Towards a Self-Reliant India" राष्ट्रीय स्पर्धेचा विजेता, DST INSPIRE-MANAK जिल्हा पुरस्कार प्राप्तकर्ता तसेच डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक सुवर्णपदक विजेता आहे.
या यशाबद्दल अरजितने आपल्या पालक, शिक्षक, मार्गदर्शक आणि सीएसआयआर–एनसीएल येथील शास्त्रज्ञांचे आभार मानले. या सन्मानामुळे विज्ञान, संशोधन, नवोपक्रम आणि विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्याने व्यक्त केली.
निती आयोगाच्या ग्रंथालयाच्या "New Collection - May 2026" मध्ये पुस्तकाचा समावेश होणे हा अरजितच्या वैज्ञानिक आणि संशोधन प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर