Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, July 25, 2026

राज्य कोषाध्यक्ष अनिल बळी यांच्या शिफारशीने हरीश चव्हाण यांची वाशिम जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई  (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस मानोरा)
मुंबई येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात महाराष्ट्र राज्य शिवसेना ग्रंथालय सेलची राज्यस्तरीय बैठक उत्साहात पार पडली. राज्याध्यक्ष बालाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, राज्य कोषाध्यक्ष अनिल बळी यांच्या शिफारशीने व शिवसेना संपर्क नेते प्रशांत पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शिवसेना ग्रंथालय सेलच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी हरीश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीत राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रंथालय क्षेत्रातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या, संघटन बळकटीकरण तसेच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
नियुक्तीनंतर हरीश चव्हाण यांनी संघटनेने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून वाशिम जिल्ह्यात ग्रंथालय क्षेत्राच्या विकासासाठी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य प्रश्नांसाठी तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी सातत्याने कार्य करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

फॉलोअर