मानोरा : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस मानोरा)इंधनामध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढल्यामुळे अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये इंजिन मिसफायर होणे, मायलेज कमी होणे, स्टार्टिंगचा त्रास आणि इंजिनची कार्यक्षमता कमी झाल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक वाहनधारकांनी विठोलीजवळ नव्याने सुरू झालेल्या नायरा पेट्रोल पंपावर इंधन भरण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, काही इतर पेट्रोल पंपांवरील इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांमध्ये विविध तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने ते पर्यायी पंपांचा शोध घेत आहेत. त्यात विठोलीजवळील नायरा पेट्रोल पंपावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत असून, आसपासच्या गावांतील नागरिकही मोठ्या प्रमाणात येथे इंधन भरण्यास येत आहेत.
याबाबत वाहनचालकांनी संबंधित तेल कंपन्या आणि प्रशासनाने इंधनाच्या गुणवत्तेबाबत नियमित तपासणी करून ग्राहकांचा विश्वास कायम ठेवावा, अशी मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment