Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, August 7, 2026

18 वर्षे पूर्ण होऊनही मतदार यादीत नाव नाही; चिखलीतील युवकाची तक्रार

मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस मानोरा): चिखली येथील भूषण निळकंठ राठोड यांची जन्मतारीख 10 ऑक्टोबर 2007 असून त्यांना 18 वर्षे पूर्ण होऊन सुमारे 9 महिने झाले आहेत. तसेच त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्सही काढले आहे. तरीदेखील त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
याबाबत चिखली येथील संबंधित BLO यांच्याकडे चौकशी केली असता, "सध्या सिस्टिममध्ये ऑक्टोबर 2006 पर्यंतच्या जन्मतारखेचीच नोंद घेता येते. त्यापुढील जन्मतारीख असलेल्या व्यक्तींची नोंदणी सिस्टिम स्वीकारत नाही," असे सांगण्यात आल्याचे भूषण राठोड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भूषण राठोड यांनी आपण 18 वर्षांवरील पात्र मतदार असूनही नाव समाविष्ट होत नसल्याने संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणूक प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून तांत्रिक अडचण असल्यास ती त्वरित दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर