Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, August 11, 2026

वने व वन्यजीव वाचविण्यासाठी जर्जरावस्थेतील वन कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पुनर्बांधणी करा पर्यावरण स्नेही जगदीश जाधव यांची वन प्रशासनाकडे मागणी.


मानोरा:( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस मानोरा)
 वनपरिक्षेत्र अधिकारी, मानोरा यांच्या कार्यक्षेत्रात चार वन वर्तुळे असून या वनवर्तुळांमध्ये अनेक वनबिटे आहेत. या वनबिटांमध्ये मागील अनेक वर्षांपासून वनरक्षक आणि वनपाल निवासाला राहत नसल्याने दुरुस्ती व देखभालीअभावी वन विभागातील निवासस्थाने जर्जर, मोडकळीस व अतिक्रमित झाली आहेत.  
विस्तीर्ण आणि वनव्याप्त परिसराच्या रक्षणासाठी वन कर्मचारी मुख्यालयी निवासाला राहावे, यासाठी मोडकळीस आलेली ही निवासस्थाने पुनर्बांधणी करून अद्यावत करावी व जंगलाचे प्रभावी रक्षण करावे, अशी मागणी करणारे निवेदन पर्यावरणप्रेमी जगदीश कमलाबाई धांदू जाधव, यांच्या वतीने उपवनसंरक्षक, वाशिम वनविभाग यांना देण्यात आले आहे.  
निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे की,  
"सावरगांव कान्होबा वनबिटात आठशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मोल्यवान वनसंपदा पसरलेली आहे. या वनसंपदेचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी सन १९६० मध्ये बांधण्यात आले वनरक्षकाचे निवासस्थान वन प्रशासनातील कर्मचारी २५ ते ३० वर्षांपासून राहायला नसल्याने सध्या पूर्णपणे मोडकळीस आले आहे. छत कोसळलेले, भिंती जीर्ण व परिसर अस्वच्छ झाला आहे. हीच अवस्था पाळोदी, शेंदोना आणि मानोरा वन वर्तुळातील वन प्रशासनाच्या शासकीय निवासस्थानांची झालेली आहे."

*अवैध वृक्षतोड वाढली*  
सरकारी निवासस्थानात वनरक्षक मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास नसल्याने अवैध वृक्षतोड व वनसंपदेची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वन्यजीव व वनसंपदेच्या संरक्षणासाठी वनरक्षकाची क्षेत्रात २४ तास उपस्थिती आवश्यक आहे.  

*तातडीने नवीन इमारत बांधण्याची मागणी*  
त्यामुळे सावरगांव कान्होबासह इतरही जीर्ण झालेले वनरक्षक निवासस्थान तातडीने पाडून नव्याने सुसज्ज इमारत बांधण्यात यावी. जेणेकरून वनरक्षकास निवासाची सोय होईल व शेकडो हेक्टरवरील वनसंपदेचे प्रभावी संरक्षण होईल, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.  
वन कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सोय झाल्यास वन्यजीव, वनसंपदा आणि अवैध कृत्यांवर अंकुश बसण्यास मदत होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.  

###
*शेंदोना, गिरोली, पाळोदी आणि मानोरा वनवर्तुळातील असंख्य वन बीटा मधील समृद्ध वनसंपदा आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी शासनाकडून निर्माण करण्यात आलेली निवासस्थाने ६० वर्षापेक्षा अधिक जुने झालेले असून काही गावात या सरकारी निवासस्थानावर अतिक्रमणे सुद्धा झाली आहेत. सरकारी निवासस्थाने मोडकळीस आल्याने वन कर्मचारी व अधिकारी मुख्यालय राहत नसल्याचा गैरफायदा वनतस्कर आणि शिकाऱ्यांना होऊन वनसंपदेचा ऱ्हास होत असल्याने उपरोक्त निवासस्थाने तातडीची बाब म्हणून निर्माण करण्यात येण्याची मागणी पर्यावरणवादी जगदीश जाधव यांच्या वतीने करण्यात आली आहे.*

फोटो ---

No comments:

Post a Comment

फॉलोअर