Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, August 21, 2026

भक्तिभावाने ‘भिला भगत दादा’ यांचा महाप्रसाद उत्साहात संपन्न खापरदरी, गिरडा, वारडा व चिखलागड या चारही गावांतील आजी-माजी सरपंच, सदस्य, नायक-कारभारी, पुढारी व भजनी मंडळांचा सहभाग


शेंदुरजना (अ) (दिग्रस साप्ताहिक एक्सप्रेस)         श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम घडवून आणणारा ‘भिला भगत दादा’ (महाराज) यांचा महाप्रसाद शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी बेहडा फाटा रोड, घाट परिसरात भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.

मानोरा तालुक्यातील खापरदरी, गिरडा, वारडा व चिखलागड या चारही गावांतील भाविक भक्त, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा भक्तिभावाने लाभ घेतला. दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेल्या महाप्रसादाच्या पंगतीत भाविकांनी सहभागी होत प्रसादाचा आनंद घेतला.

या धार्मिक सोहळ्याला खापरदरी, गिरडा, वारडा व चिखलागड या चारही गावांतील आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नायक-कारभारी, सामाजिक व राजकीय पुढारी तसेच भजनी मंडळांचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.

श्री भिला भगत दादा (महाराज) की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भजनी मंडळांच्या भक्तिमय सादरीकरणामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले. चारही गावांतील नागरिक एकत्र आल्याने सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि श्रद्धेचे दर्शन घडले.

भिला भगत दादा (महाराज) यांच्या चरणी सेवा अर्पण करण्याच्या उद्देशाने आयोजित या महाप्रसादातून भक्ती, सेवा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.

महाप्रसाद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या चारही गावांतील सेवेकरी, भजनी मंडळे, आजी-माजी सरपंच, सदस्य, नायक-कारभारी, पुढारी, भाविक भक्त तसेच ग्रामस्थ आणि नागरिकांचे आयोजकांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर