Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Friday, August 21, 2026

शेंदुरजना (अ) येथे क्षयरोग तपासणी शिबीर संपन्न

शेंदुरजना (अ) (दिग्रस साप्ताहिक एक्सप्रेस) प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुरजना (अ) येथे संशयित क्षय रुग्नाचे तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशिनद्वारे एक्स रे तपासणी करण्यात आली.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शंकर नांदे यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकिय अधिकारी डॉ. कोयल राठोड, डॉ. कृष्णा शिंदे यांचे उपस्थितीत क्ष - किरण वैज्ञानिक अधिकारी सतीश सैबेवार यांनी 116 संशयिताचे एक्स रे काढले. यावेळी उपस्थित किरण भोरकडे, कैलाश डोंगरे, निशा दाभने, श्रीकृष्ण भगत, विशाल राठोड, अभिमान उचित, संदीप कटकतलवारे, आशाताई काजळे, प्रशांत तूरक, अजय धांडे, राजू भांडारकर, गणेश राऊत, तसेच आशा कार्यकर्ती  उपस्थित होत्या. यावेळी 32 संशयीताचे स्पुटम गोळा करण्यात आले. तसेच हॅन्ड हेल्ड एक्स रे मशीनद्वारे आरोग्य उपकेंद्र रुई येथील ग्रामपंचायत मध्ये टेक्निशियन कार्तिक शिरसाट यांनी 103 संशयिताचे एक्स रे काढले. यावेळी 80 स्पुटम गोळा करण्यात आले. सुशीला भगत विकास खडसे, सागर घोटकर, राजेंद्र ठोंबरे, विनोद भगत, मनीष जाधव, आशा कार्यकर्ती उपस्थित होत्या. ग्रामपंचायत अधिकारी विजया खाडे यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले. शिबीराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर