Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, August 24, 2026

श्रावण भक्तीचा जागर; खापरदरी ते पोहरादेवी पायदळ पालखी सोहळा उत्साहात


 संत रामराव महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी श्रद्धाळूंची पायी वारी; पालखी सोहळ्याचे १६वे वर्ष 

शेंदुरजना (अ) (दिग्रस साप्ताहिक एक्सप्रेस)    श्रावण मासाचे औचित्य साधत बंजारा समाजाचे श्रद्धास्थान व धर्मगुरू संत रामराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ग्राम खापरदरी येथून बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे पायदळ पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

 *आयोजक : समस्त गावकरी मंडळ, खापरदरी* 
यंदा या भक्तिमय पालखी सोहळ्याचे १६वे वर्ष होते. या पायी पालखीद्वारे भाविकांनी संत रामराव बापू, भगवान भोलेनाथ, माता जगदंबा देवी तसेच संत सेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन व आशीर्वाद घेतले.

श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या पालखी सोहळ्यात गावातील महिला, पुरुष, युवक तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. टाळ-मृदंगाचा गजर, भजन-कीर्तन आणि जयघोषाने खापरदरी ते पोहरादेवीचा संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला.
*श्रद्धेची परंपरा, भक्तीची पाऊलवाट आणि एकतेचा जागर—खापरदरी ते पोहरादेवी पालखी सोहळ्याची १६ वर्षांची अखंड परंपरा यंदाही ग्रामस्थांनी भक्तिभावाने जपली.*

No comments:

Post a Comment

फॉलोअर